१ हजार वाहने कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:45+5:302020-12-26T04:13:45+5:30

किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी कल आहे. सीसीआयकडून शहरासह ...

1000 vehicles waiting to buy cotton | १ हजार वाहने कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत

१ हजार वाहने कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी कल आहे. सीसीआयकडून शहरासह वालूर आणि देवगाव फाटा येथील ९ कापूस जिनिंगवर कापूस खरेदी केली जात आहे. सेलू तालुका व पर जिल्ह्यातून कापसाची सेलू येथील सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी वाहने दाखल होत आहेत. परिणामी बाजार समितीचा कापूस यार्ड परिसर वाहनांनी फुल्ल झाला आहे. तसेच पाथरी रस्ता आणि तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर वाहनांची रांग लागत आहे. कधी जिनिंग मध्ये कापूस साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने खरेदी बंद केली जाते. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सीसीआयच्या अधिकाऱ्यांना सुट्टी मिळते. त्यामुळे आठवड्यातील दोन दिवस खरेदी बंद राहते. त्यातच शुक्रवारी नाताळची सुट्टी आणि लगेच शनिवार, रविवार असल्याने सलग ३ सु ट्ट्या आल्याने कडाक्याच्या थंडीत आठ आठ दिवसापासून कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना वाहन खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज

सेलू येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर बीड, जालना जिल्ह्यासह विदर्भातून कापूस विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे आठ- आठ दिवस कापसाचे माप होत नाही. गर्दीमुळे सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनाही ताटकळत बसावे लागत आहे. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी स्वतंत्र जिनिंग देऊन प्राधान्याने त्यांचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी सेलू तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

३ लाख क्विंटल कापसाची खरेदी

सेलू येथील ९ कापूस जिनिंगवर सीसीआयकडून १९ नोव्हेंबरपासून खरेदी केली जात आहे. एक महिन्यात ३ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कापूस खरेदी आणि गर्दी सेलू येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आहे.

Web Title: 1000 vehicles waiting to buy cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.