१०२ जणांची केली आरटीपीसीआर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:45+5:302021-01-08T04:52:45+5:30
कोराेना संसर्गाचा धोका वाढू नये, या उद्देशाने दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरटीपीसीआर चाचणी मोहीम सुरू करण्यात ...
कोराेना संसर्गाचा धोका वाढू नये, या उद्देशाने दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरटीपीसीआर चाचणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही चाचणी मोफत केल्या जात आहे. या मोहिमेस १ जानेवारीपासून प्रारंभ झाला. ५ जानेवारी रोजी पोखर्णी येथील आरोग्य उपकेंद्रात तपासण्या करण्यात आल्या. येथील सर्व व्यवसायिक त्यांचे कर्मचारी व इतर अशा एकूण १०२ चाचण्या करण्यात आल्या. ही तपासणी दैठणा आरोग्य केंद्राचे विशेष पथकाने केली असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. यू. निलंगेकर, डॉ. अमोल चव्हाण, डॉ. गजेंद्र कानडे, डॉ. जयश्री रांजणे, डॉ. शिवदास शिंदे, किरणताई बेंद्रे, डॉ अमजद खान, डॉ. किरण सातपुते, डॉ. सय्यद खजिर, डॉ. अंकुश भोसले, स्वयंसेवक उमेद मिलके यांच्यासह आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. अजीम शेख, कल्पे, काष्ठे यांच्यासह आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.