परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या १०६ रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:14 PM2020-11-24T16:14:50+5:302020-11-24T16:18:17+5:30
जिल्ह्यात १५ दिवसांपासून स्वॅब तपासण्यावर भर देण्यात आला आहे.
परभणी : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन १६ रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी मागील काही दिवसांपासून रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी आरटीपीसीआरच्या साह्याने ५१ आणि रॅपिड टेस्टच्या साह्याने ११६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण १५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता एकूण ६ हजार ९९९ रुग्ण झाले असून, ६ हजार ६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २८७ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १०६ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात गंगाखेड शहरातील मन्नाथनगर, सोनपेठ शहरातील विटा रोड परिसर, परभणी शहरातील खाजगी रुग्णालय, पोलीस क्वॉर्टर (२), दर्गा रोड, रामकृष्णनगर, राहुलनगर, क्रांती चौक, तालुक्यातील मांडाखळी (२), जिंतूर शहरातील आमदार कॉलनी, पालम शहरातील सिरसकर गल्ली, हरिनगर या भागात कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
तपासण्या वाढविल्या
जिल्ह्यात १५ दिवसांपासून स्वॅब तपासण्यावर भर देण्यात आला आहे. दररोज १०० ते १२५ जणांच्या स्वॅब तपासण्या केल्या जात आहेत.