परभणी : बंधाºयांच्या कामासाठी ११ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:19 AM2017-12-14T01:19:53+5:302017-12-14T01:19:59+5:30

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला ११ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, या अंतर्गत ८४ ठिकाणी सिमेंट व कोल्हापुरी बंधारे उभारण्यात येणार आहेत़

11 crores fund for the work of Parbhani | परभणी : बंधाºयांच्या कामासाठी ११ कोटींचा निधी

परभणी : बंधाºयांच्या कामासाठी ११ कोटींचा निधी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला ११ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, या अंतर्गत ८४ ठिकाणी सिमेंट व कोल्हापुरी बंधारे उभारण्यात येणार आहेत़
जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे सिमेंट बंधारे व कोल्हापुरी बंधारे उभारण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते़ त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, यासाठीचा ११ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला आहे़ या निधीतून ८३ ठिकाणी सिमेंट बंधारे व एका ठिकाणी कोल्हापुरी बंधारा उभारण्यात येणार आहे़ त्यामध्ये सेलू तालुक्यातील आहेरबोरगाव येथे कोल्हापुरी बंधारा उभारण्यासाठी ४३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ उर्वरित ८३ ठिकाणांमध्ये सोनपेठ तालुक्यातील देवीनगर तांडा, मरगळवाडी, वैतागवाडी, उखळी येथे दोन, जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे (३ बंधारे), वरुड नृसिंह, पिंपळगाव का़, कुºहाडी, सावरगाव तांडा, वेलुरा, कावी, येनोळी, दहेगाव, वाघी बोबडे (२ बंधारे), केहाळ (२ बंधारे), चारठाणा, कान्हा, असोला, गणेशपूर, सुकळी वाडी, साखरतळा, नांगणगाव (२ बंधारे), संक्राळा, कुºहाडी, आडगाव, गणेशनगर, इटोली, ब्राह्मणगाव़ पूर्णा तालुक्यातील बरबडी, आळेगाव, पिंपळगाव बाळापूर, धोत्रा, आलेगाव, फुलकळस, देवठाणा़ पालम तालुक्यातील डोंगरगाव, रोकडेवाडी, रामापूर, फत्तूनाईक तांडा़ सेलू तालुक्यातील डुघरा (२ बंधारे), डासाळा, गिरगाव, कुडा, आहेरबोरगाव, रवळगाव, राधेधामणगाव़ गंगाखेड तालुक्यातील बोर्डा (२ बंधारे), खळी, खादगाव, झोला, इसाद, उमाटवाडी, तांदूळवाडी, नरळद़ परभणी तालुक्यातील पारवा, झरी, टाकळी बोबडे, टाकळी कुंभकर्ण, ब्राह्मणगाव, सायाळा, ताडपांगरी, माळसोन्ना़, दुर्डी़ पाथरी तालुक्यातील रेणापूर (२ बंधारे), नाथ्रा, लोणी बु़, वाघाळा, मानवत तालुक्यातील मानोली या गावांचा समावेश आहे़ प्रत्येक सिमेंट बंधाºयासाठी सरासरी १० ते १४ लाख रुपया दरम्यानचा निधी मंजूर करण्यात आला आहे़

Web Title: 11 crores fund for the work of Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.