दिवसभरात ११ हजार ७५२ नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:03+5:302021-07-07T04:22:03+5:30
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण शिबिरे घेतली जात आहेत. सोमवारी १२९ केंद्रांवर लसीकरण ...
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण शिबिरे घेतली जात आहेत. सोमवारी १२९ केंद्रांवर लसीकरण सत्र राबविण्यात आले. त्यात ११ हजार ७५२ नागरिकांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील १२९ केंद्रांवर लसीकरण सत्र राबविण्यात आले. त्यात ११ हजार ७५२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख १९ हजार ५५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात ३ लाख ३७ हजार ६८९ नागरिकांनी पहिला डोस, तर ८१ हजार ८६४ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण लसीकरणात २ लाख २५ हजार ३२० पुरुष आणि १ लाख ९४ हजार १८८ महिलांचे लसीकरण झाले आहे.
सर्वाधिक नागरिकांनी घेतली कोविशिल्डची लस
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. त्यात ३ लाख ३१ हजार ४३२ नागरिकांनी कोविशिल्डची लस घेतली असून ८८ हजार १२१ नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे.