१८० टन कचऱ्यापासून ११० टन खत तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:49+5:302020-12-27T04:12:49+5:30

तीन टन सुक्या कचऱ्यावर रिसायकलिंग मानवत शहर शिवारात सर्वे नंबर २०८ वर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या ठिकाणी ...

110 tons of manure made from 180 tons of waste | १८० टन कचऱ्यापासून ११० टन खत तयार

१८० टन कचऱ्यापासून ११० टन खत तयार

Next

तीन टन सुक्या कचऱ्यावर रिसायकलिंग

मानवत शहर शिवारात सर्वे नंबर २०८ वर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या ठिकाणी पालिकेच्या वतीने प्रकल्पाभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली असून, या ठिकाणी पाण्याची आणि पूर्णवेळ वीज व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यातील वजन करण्याकरीता वजन काटे बसविण्यात आले आहेत. तसेच सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने आधुनिक यंत्र खरेदी केले आहेत. यातील काही यंत्र प्रकल्पावर दाखल झाले आहेत. शहरात दररोज गोळा होणाऱ्या ३ टन कचऱ्यावर रिसायकलिंग केली जात आहे.

शहरातील विविध प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेच्या घंटागाड्या नागरिकांच्या दारापर्यंत येत आहेत. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या बॉक्टस टाकावा.

राणी अंकुश लाड, उपनगराध्यक्ष, नगरपालिका

घनकचरा प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यासाठी पालिकेने काम सुरू केले आहे. यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री प्रकल्पावर दाखल झाली आहे.

जयंत सोनवणे, मुख्याधिकारी, न.प.

Web Title: 110 tons of manure made from 180 tons of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.