तीन महिन्यांत ११० टन सेंद्रिय कंपोस्ट खत तयार, नगरपालिकेचा उपक्रम : नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:29+5:302021-01-13T04:42:29+5:30
गंगाखेड शहरातून निघणारा ओला कचरा, सुका कचरा व विघटनशील आणि अविघटनशील कचरा कुजविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला. नगरपालिकेच्यावतीने ...
गंगाखेड शहरातून निघणारा ओला कचरा, सुका कचरा व विघटनशील आणि अविघटनशील कचरा कुजविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला. नगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा वर्गीकरण करून जमा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जमा केलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून गट्टू निर्मिती करण्यात आली. तसेच शहरात कचऱ्याचे ढीग साचून शहर सौंदर्याला बाधक ठरू नये, यासाठी दररोज नगरपालिकेच्यावतीने कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचे नियोजन आखले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा प्रकल्पातून तीन महिन्यांत ११० टन कंपोस्ट खत तयार करण्यात आला. त्याच्यावर विंडो कंपोस्टिंग ९० टक्के तर वर्मी कंपोस्टने १० टक्के प्रक्रिया करण्यात आली. प्लास्टिक पासून गट्टू निर्मिती करून सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे शहर सौंदर्यसह सेंद्रिय पद्धतीचे कंपोस्ट खत ही तयार झाले आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता प्रसाद माळी, स्वच्छता निरीक्षक वसंत वाडकर यांनी प्रयत्न केले.
शहराच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहून विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शहरातील विकास कामासाठी ४ कोटी ६८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
विजयकुमार तापडिया, नगराध्यक्ष, गंगाखेड.