पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ११११ कोटींची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:34+5:302021-01-23T04:17:34+5:30

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची ...

1111 crore debt relief to 52 lakh farmers | पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ११११ कोटींची कर्जमुक्ती

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ११११ कोटींची कर्जमुक्ती

Next

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असून, ८ हजार २२३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने ते या योजनेपासून वंचित आहेत.

राज्यात राज्य शासनाने २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या ७ याद्या आतापर्यंत प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ जानेवारी अखेरपर्यंत १ लाख ८२ हजार ७१८ लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण केले. त्यापैकी १ लाख ७८ हजार १५५ लाभार्थ्यांच्या खात्यात ११११.२१ कोटी रुपये शासनाच्यावतीने जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ४ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणिकरण केले नसल्याने ८ हजार २२३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना यासाठी प्रशासनाच्यावतीने संधी देण्यात येत आहे. त्यांनी येत्या तीन दिवसांत जवळच्या शासकीय केंद्र, सीएनसी सेंटर किंवा बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ देणे सोपे होईल. तसेच कर्जमुक्त झालेले शेतकरी २०२०-२१ या हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. आधार प्रमाणिकरण न करून घेतल्यास योजनेचा लाभ, तर मिळणारच नाही, उलट कर्जाची रक्कम व्याजासह बँकेकडून वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे यादीत नाव असलेल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

सर्वाधिक कर्जमुक्ती एसबीआयकडून

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० बँकांमधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५७७ कोटी १२ लाख ५९ हजार ७१ रुपयांची कर्जमुक्ती भारतीय स्टेट बँकेतील ८१ हजार ४०५ शेतकऱ्यांची झाली आहे. या बँकेने एकूण ९५ हजार ८०४ खाते पोर्टलवर अपलोड केले होते. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३४ हजार ४ लाभधारक शेतकऱ्यांची २६३ कोटी ७७ लाख १७ हजार २५७ रुपयांची कर्जमुक्ती केली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ३६ हजार ८९९ शेतकऱ्यांना ९० कोटी ७६ लाख ८७ हजार ७०१ रुपयांची कर्जमुक्ती दिली आहे.

Web Title: 1111 crore debt relief to 52 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.