जिल्ह्यात १२ रुग्ण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:07+5:302021-01-08T04:52:07+5:30
दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने मागील आठवड्यापासून आरटीपीसीआर चाचण्यांवर भर दिला आहे. सोमवारी ...
दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने मागील आठवड्यापासून आरटीपीसीआर चाचण्यांवर भर दिला आहे. सोमवारी १ हजार ९५१ नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २ पॉझिटिव्ह आहेत, तर रॅपिड टेस्टच्या १०० अहवालात १० जण बाधित आढळले आहेत. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आता ७ हजार ६४० रुग्ण नोंद झाले असून, त्यापैकी ७ हजार २४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ९ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
एसटी डेपोतील ७ जणांना कोरोना
आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये १२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एसटी डेपोमधील ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आदित्यनगरातील ७४ वर्षीय वृद्ध, शिवाजीनगर येथील ४१ वर्षीय पुरुष, जुना पेडगाव रोड भागातील ४२ वर्षीय महिला, गांधी विद्यालय गव्हाणे रोड येथील ४८ वर्षीय पुरुष आणि क्रांतीचौक भागातील ५२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.