कृषी विद्यापीठातील १२९९ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:25+5:302021-03-23T04:18:25+5:30

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध विभागात एकूण २ हजार ८८४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये अ ...

1299 posts vacant in Agriculture University | कृषी विद्यापीठातील १२९९ पदे रिक्त

कृषी विद्यापीठातील १२९९ पदे रिक्त

Next

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध विभागात एकूण २ हजार ८८४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये अ प्रवर्गातील ५९८, ब प्रवर्गातील १६९, क प्रवर्गातील ७२९, ड प्रवर्गातील १ हजार ३८३ पदांचा समावेश आहे. सद्यस्थितीत १ हजार ५८५ पदे भरण्यात आली आहेत. त्यात अ प्रवर्गाच्या ३५०, ब प्रवर्गाच्या ८१, क प्रवर्गाच्या ४३४ आणि ड प्रवर्गाच्या ७१८ पदांचा समावेश आहे. सद्यस्थितीत अ प्रवर्गाची २४८, ब प्रवर्गाची ८८, क प्रवर्गाची २९५ आणि ड प्रवर्गाची ६६८ पदे रिक्त आहेत. अ प्रवर्गातील रिक्त पदांमध्ये संचालकांची २, सहयोगी अधिष्ठाता १०, प्राध्यापकांची २०, सहायक प्राध्यापकांची १०९, सहयोगी प्राध्यापक ८९, कार्यक्रम समन्वयक १, उप विद्यापीठ अभियंता ३, विद्यार्थी कल्याण अधिकारी १, कुलगुरू यांचे स्वीय सहायक १, सहाय्यक कुलसचिवांच्या ७ पदांचा समावेश आहे. याशिवाय ब प्रवर्गातील वरिष्ठ संशोधन सहायक कृषीची तब्बल ४०, तर सहायक कक्ष अधिकाऱ्याची १२, वरिष्ठ संशोधन सहायक जैवतंत्रज्ञची ४, अन्नतंत्रची ३, लघुलेखकची ९, तांत्रिक सहायक ४, कार्यक्रम सहायक संगणक ३ आदी पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे या संधीचा लाभ काही विशिष्ठ व्यक्तींनी घेतला असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडेच महत्त्वाच्या पदांचा पदभार आहे. विशेष म्हणजे काही जणांवर अनियमिततेचा आरोप असतानाही त्यांच्याकडेच पदभार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: 1299 posts vacant in Agriculture University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.