जिल्ह्यात १४ रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:12+5:302021-01-25T04:18:12+5:30
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असली तरी प्रत्यक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद मर्यादित रहात ...
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असली तरी प्रत्यक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद मर्यादित रहात असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी आरोग्य विभागाला ९३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ६१ अहवाल आरटीपीसीआरचे तर ३२ अहवाल रॅपिड टेस्टचे आहेत. आरटीपीसीआरमध्ये १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह नोंद झाले आहेत. तर रॅपिड टेस्टमध्ये दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात १४ रुग्णांची नोंद झाली असून, १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ९१४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ७ हजार ५०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३१३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ९६ रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी येथील आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १०, पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात १ आणि परभणी शहरातील खासगी रुग्णालयात २७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५८ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत.