परभणी जिल्ह्यातील पाथरीत दीड कोटी तर पूर्णेत ७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:15 AM2018-02-18T00:15:02+5:302018-02-18T00:15:14+5:30

पाथरी येथील शुभकल्याण मल्टी स्टेट को आॅप सोसायटीतील ठेवीदारांना दीड कोटी रुपयांना तर पूर्णा येथील एका बेरोजगार युवकास ७ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर समोर आला आहे़ या दोन्ही प्रकरणात पाथरी, पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये १६ आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

1.5 crore in Patwani district and Rs 7 lakh fraud in Purna | परभणी जिल्ह्यातील पाथरीत दीड कोटी तर पूर्णेत ७ लाखांची फसवणूक

परभणी जिल्ह्यातील पाथरीत दीड कोटी तर पूर्णेत ७ लाखांची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी/परभणी : पाथरी येथील शुभकल्याण मल्टी स्टेट को आॅप सोसायटीतील ठेवीदारांना दीड कोटी रुपयांना तर पूर्णा येथील एका बेरोजगार युवकास ७ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर समोर आला आहे़ या दोन्ही प्रकरणात पाथरी, पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये १६ आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़
पाथरी येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलीप शंकरराव आपेट यांनी तीन वर्षापूर्वी शुभकल्याण मल्टीस्टेट को-आॅप के्रडीट सोसायटी सुरू केली़ जास्त व्याजदराचे आमिष दाखवून सोसायटी मार्फत ग्राहकांना आकर्षित केले जात होते़ त्यामुळे अनेक ग्राहकांनी या सोसायटीत पैशांची गुंतवणूक केली होती़ अल्पावधीतच या सोसायटीने ग्राहकांचा विश्वास संपादित केला़ त्यामुळे ठेवीदारांची संख्या झपाट्याने वाढली़
मात्र मागील काही महिन्यांपासून ठेवीची मुदत संपलेल्या ग्राहकांनी रकमेची मागणी केली तेव्हा बँकेत पैसे नसल्याने ठेवीदारांना हे पैसे मिळत नव्हते़ त्यामुळे ओरड सुरू झाली़ अलीकडच्या काळात पैशांची मागणी करणाºया ठेवीदारांची गती वाढत गेली़ सोसायटीचे अध्यक्ष आणि पदाधिकाºयांनी शाखेकडे पाठ फिरविताच कर्मचाºयांनीही सोसायटीला कुलूप ठोकून पोबारा केला़ दरम्यानच्या काळात सोसायटीमध्ये ठेवलेल्या सर्व ठेवी काढून घेत सोसायटीचे खाते रिकामे करण्यात आले़ फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही ठेवीदारांनी वेगवेगळ्या मार्गाने रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केले़ परंतु, हाती काहीच लागले नाही़ अखेर १६ फेब्रुवारी रोजी पाथरी येथील यशवंतराव दत्तात्रय जवळेकर यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली़ यात शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅप़ सोसायटीचे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट, अजय दिलीप आपेट, विजय दिलीप आपेट आदी ११ पदाधिकारी व कर्मचाºयांनी गुंतवणूक केलेले १ कोटी ४७ लाख ६८ हजार ४७ रुपये परत न देता या रकमेचा अपहार केला, असे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षांसह ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस निरीक्षक व्ही़व्ही़ श्रीमनवार तपास करीत आहेत़
रेल्वेत नोकरी लावतो म्हणून सात लाखांची फसवणूक
परभणी : रेल्वे खात्यात नोकरी लावतो, असे म्हणून एका युवकाची सात लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना पूर्णा शहरात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पूर्णेतील एकबालनगर येथील रहिवासी मो. चाँद पाशा मो. नवाज यांच्या भावास पाच आरोपींनी रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. २९ एप्रिल २०१७ ते २ आॅगस्ट २०१७ या काळात आरोपींनी वारंवार संपर्क साधून मो. चाँद पाशा यांच्याकडून ७ लाख रुपये घेतले. विशेष म्हणजे, बनावट नियुक्तीपत्रही त्यास दिले. मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचे काही दिवसांनंतर त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मोहम्मद चाँद पाशा मो. नवाज यांनी पूर्णा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यावरुन सात लाख रुपयांना फसविल्या प्रकरणी श्रीधर आडेकर (रा़पूर्णा ), तिरुपला हलदीपापडी (नवी दिल्ली) आणि कोलकत्ता येथील दीपककुमार, मनिषकुमार, रमेशकुमार अशा पाच जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे अधिक तपास करीत आहेत़
बनाव करून लाटले ५० हजार
परभणी- स्टेट बँक आॅफ इंडियातील अधिकारी असल्याचा बनाव करून एटीएम क्रमांक व पीनकोड क्रमांक मिळवित एका महिलेच्या खात्यातील ५० हजार रुपये परस्पर लाटल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला़ या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ या संदर्भात सेलू शहरातील आदर्शनगर येथील रहिवासी उषा माणिकराव रोकडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली़ या तक्रारीत त्यांनी म्हटले की, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मला फोन करून मी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले़ खाते अपडेट करण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक आणि एटीएम क्रमांक मागवून घेतला़ १६ फेब्रुवारी रोजी बँकेत जाऊन खात्याची माहिती घेतली तेव्हा माझ्या खात्यातून ५० हजार रुपये काढल्याचे समोर आले़ बनाव करून फसवणूक केल्याची बाब लक्षात आली़ या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जमादार लाड तपास करीत आहेत़

Web Title: 1.5 crore in Patwani district and Rs 7 lakh fraud in Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.