दिवाळी काळात विक्रीसाठी आणलेले १५ लाखांचे मोबाईल दुकान फोडून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 06:37 PM2020-11-10T18:37:33+5:302020-11-10T18:38:16+5:30

चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

15 lakh mobile stolen brought for sale during Diwali | दिवाळी काळात विक्रीसाठी आणलेले १५ लाखांचे मोबाईल दुकान फोडून लंपास

दिवाळी काळात विक्रीसाठी आणलेले १५ लाखांचे मोबाईल दुकान फोडून लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देजिंतूर शहरातील मुख्य रस्त्यावरील घटना

जिंतूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील  विठ्ठल मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे १५० मोबाईल लंपास केल्याची घटना मंगळवारी ( दि.१० ) सकाळी उघडकीस आली. याची किंमत जवळपास १५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील मुख्य रस्त्यावर पुरुषोत्तम विठ्ठलदास पोरवाल यांच्या मालकीचे विठ्ठल मोबाईल हे दुकान आहे. दिवाळीच्या काळामध्ये विक्रीच्या उद्देशाने त्यांनी अनेक मोबाईल दुकानात मागवले होते. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सॅमसंग,विवो, ओप्पो, वन प्लस, रेड मी यासह इतर नामांकित कंपन्यांचे नवीन 93 व जुने 50 मोबाईल चोरून नेले.

मंगळवारी सकाळी मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तत्काळ पोरवाल यांना याची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. 

Web Title: 15 lakh mobile stolen brought for sale during Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.