परभणीत १५ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:15 AM2018-02-19T00:15:14+5:302018-02-19T00:15:55+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली़ १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़

15,000 students in Parbhani gave scholarship exam | परभणीत १५ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

परभणीत १५ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली़ १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली़ या परिक्षेला पाचवीसाठी एकूण ८ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र सादर केले होते़ तर आठवीसाठी ७ हजार ८३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते़ रविवारी पाचवीतील विद्यार्थ्यांची ५१ परीक्षा केंद्रावर तर आठवीची ८० परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली़ यामध्ये परभणी तालुक्यातील ९९७, मानवत ७२३, सेलू ८२०, पूर्णा ९३९, गंगाखेड ७२७, पालम ३७९, सोनपेठ ३७५, जिंतूर ९२६, पाथरी ५५२ तर परभणी शहरातून १ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३१० विद्यार्थी या परिक्षेला अनुपस्थितीत राहिले़
आठवीतील ६ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यामध्ये परभणी तालुक्यातून ९३०, मानवत तालुक्यातून ४३७, सेलू तालुक्यातून ६५३, पूर्णा ६३८, गंगाखेड ५५२, पालम २५८, सोनपेठ २२४, जिंतूर ७३१, पाथरी ५१५ तर परभणी शहरातून १ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ तर २६१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले़

Web Title: 15,000 students in Parbhani gave scholarship exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.