१६० बसेस कोरोना फ्री; प्रवासी मात्र बेफिकीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:19 AM2021-09-18T04:19:52+5:302021-09-18T04:19:52+5:30
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एसटी महामंडळाची बस सेवा पूर्णतः बंद होती. त्यामुळे या महामारीचा एसटी महामंडळ प्रशासनाला ...
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एसटी महामंडळाची बस सेवा पूर्णतः बंद होती. त्यामुळे या महामारीचा एसटी महामंडळ प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला. यातून सावरत असताना शासनाकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने जिल्ह्यातील पाथरी, परभणी, गंगाखेड व जिंतूर या चार आगारातील १६० हून अधिक बसेसला अँटी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे या बसेस कोरोना फ्री झाले आहेत. एसटी महामंडळ प्रशासन कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असताना दुसरीकडे मात्र प्रवासी आपल्या बेफिकीरीने वागत आहेत. याकडे लक्ष देऊन कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.