अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

By राजन मगरुळकर | Published: August 2, 2023 04:55 PM2023-08-02T16:55:21+5:302023-08-02T16:56:03+5:30

मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले.

162 persons took official tap connection under Abhay Yojana; Six more days | अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

googlenewsNext

परभणी : महापालिकेमार्फत नळधारकांचे सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांसाठी अधिकृतरित्या नळ जोडणी घेण्यासाठी अभय योजना लागू केली आहे. मंगळवारपर्यंत शहरात १६२ नागरिकांनी जोडणी अधिकृत करून घेतली आहे. अजून सहा दिवसांच्या मुदतीत नळ जोडणी घेता येणार असल्याची माहिती आयूक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली.

मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले. अनधिकृत नळ जोडणी धारकांना अधिकृतपणे नळ जोडणी करण्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत अभय योजना लागु केली आहे. अभय योजनेमध्ये अनधिकृत नळ जोडणी धारकांना नळ जोडणीस सदर योजनेचे शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत. जोडणीसाठीचे शुल्क भरणाकरून नळ जोडणी अधिकृत करून घेता येत असल्याने नागरिकांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. शेवटचे सहा दिवस शिल्लक असल्याने योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्तांनी केले.

असे आहेत प्रभागनिहाय जोडणी
प्रभाग समिती अ ५२
प्रभाग समिती ब ४१
प्रभाग समिती क ६९
एकूण जोडणी १६२

अन्यथा पाच हजार दंड
महापालिका हद्दीत अनधिकृत नळ धारकांनी सहा ऑगस्टपूर्वी आपली जोडणी अधिकृत करून योजनेचा लाभ घ्यावा. अन्यथा ७ ऑगस्टरपासून महापालिकेमार्फत अनधिकृत नळ जोडणी धारकांकडून पाच हजार रुपये दंड वसुल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: 162 persons took official tap connection under Abhay Yojana; Six more days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.