लॉकडाउननंतर सात महिन्यात २ हजार ३९६ व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:49+5:302021-01-08T04:52:49+5:30
शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमीन,प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांना शेत जमीन प्लॉट ...
शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमीन,प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.
त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांना शेत जमीन प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी तसेच इतर व्यवहारासाठी तालुकास्तरीय दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. यामुळे या कार्यालयास विशेष असे महत्त्व आहे. देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. यामुळे २३ मार्च ते १५ मे दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध कार्यालयातील काही व्यवहार सुरू करण्याची मुभा केंद्र आणि राज्य सरकारने दिली होती.१८ मे पासून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत आणि इतर व्यवहार सुरू झाले होते. लॉकडाउन पूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयात १८ मे ते ३१ डिसेंबर पर्यंत या कालावधीत एकूण २ हजार ३९६ व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात झाले आहेत. यामध्ये खरेदीखत, संमती पत्र, दत्तक पत्र, आदलाबदल, बक्षीस पत्र, भाडे पत्र, लिव्ह, लायसनस, गहाण खत, वाटणीपत्र, सार्वधिकार पत्र, रिलीज डिड, हक्कसोडपत्र, चूक दुरुस्तीपत्र या व्यवहाराचा समावेश आहे.
शासनाच्या नियमांचे पालन करीत व्यवहार
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक केले आहे. फिजिकल डिस्टन्स ठेवण्याबाबत काटेकोरपणे पालन केले जात असून दुय्यम निबंधक कार्यालयातील कामेपूर्वपदावर आली आहेत. पुढील वर्षात आणखी व्यवहार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे
मे ते डिसेंबरमध्ये झालेले व्यवहार
खरेदी खत - ९७५
बक्षीस पत्र - ९६९
गहाण खत - ९३
वाटनी पत्र - ६५
हक्कसोड पत्र - १३७
चूक दुरुस्त पत्र - ३५
मृत्यूपत्र - ५
रिलीज डीड - १८
सर्वाधिकार पत्र - ६
लिव्ह लायनसस - ७
भाडेपत्र - ८
अदला बदली- २
संमती पत्र - ५
दत्तक पत्र - १
एकूण -२३९६
कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर शासनाने आदेशित केलेले सर्व व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू आहेत.
- व्ही बी पदमवार, दुय्यम निबंधक मानवत.