बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे २०० कोटींचा व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:07+5:302021-03-16T04:18:07+5:30
१०२ शाखांतील व्यवहार बंद जिल्ह्यात १६ राष्ट्रीयीकृत बँका असून, या बँकांच्या १०२ शाखा कार्यरत आहेत. या सर्व बँका सोमवारी ...
१०२ शाखांतील व्यवहार बंद
जिल्ह्यात १६ राष्ट्रीयीकृत बँका असून, या बँकांच्या १०२ शाखा कार्यरत आहेत. या सर्व बँका सोमवारी बंद ठेवण्यात आल्या. विशेष म्हणजे परभणी शहरात एस.बी.आय. बँकेची चेस्ट बँक कार्यरत आहे. ही बँकही बंद राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना होणारा पतपुरवठा दिवसभरासाठी बंद होता. त्याचप्रमाणे याच बँकेच्या अंतर्गत चेक क्लिअरन्स युनिट असून, तेही बंद असल्याने धनादेश न वठल्याने त्याचाही परिणाम इतर बँकांच्या कामकाजावर झाला.
पत्रके वाटून जनजागृती
येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग नोंदविला. खासगीकरणाच्या विरोधात पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. बँकांचे खासगीकरण झाल्यास जनधन, मुद्रा लोन, शैक्षणिक कर्ज, शेती कर्ज, गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती, पेन्शन योजना यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून सरकारी बँकांना जोडलेला ग्राहक अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे खासगीकरणास विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात दौलत सरवदे, मंगेश टिकुळे, सुमित प्रधान, मयूरी खंदारे, सुनीता वैद्य, रामा मोरे, जनार्दन दुधारे, महेश सुतार, कृष्णा आव्हाड, आदींनी सहभाग नोंदविला.