जिल्ह्यात २१ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:38+5:302021-02-23T04:25:38+5:30
परभणी : कोरेानाचा संसर्ग वाढत चालला असून, दररोज नवीन रुग्ण नोंद होत आहेत. रविवारी २१ जणांना कोरेानाची लागण झाली ...
परभणी : कोरेानाचा संसर्ग वाढत चालला असून, दररोज नवीन रुग्ण नोंद होत आहेत. रविवारी २१ जणांना कोरेानाची लागण झाली असून, उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यभरात रुग्ण वाढत असून, जिल्ह्यातही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली. प्रशासनाला ३४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या ३०९ अहवालांमध्ये १६, तर रॅपिड टेस्टच्या ३६ अहवालात पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आठ हजार २६८ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली असून, सात हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३२१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, सध्या १७८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५४वर पोहचली आहे. या शिवाय खासगी रुग्णालयामध्ये ४० रुग्ण उपचार घेत असून, ७७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
..या भागात आढळले रुग्ण
रविवारी परभणी शहरातील सरफराज नगर, मदिना पाटी, यशोधन नगर, प्रभावती नगर, नवा मोंढा, नर्सेस क्वार्टर या भागात रुग्णांची नोंद झाली आहे. या शिवाय जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी, माजलगाव तालुक्यातील सावरगाव, परभणी तालुक्यातील आर्वी या ठिकाणी रुग्ण नोंद झाले आहेत.
एकूण रुग्ण : ८२६८
मुक्त ७७६९
मृत्यू ३२१
उपचार १७८
होम आयसोलेशन ७७