दिवसभरात २१५ बाधित आढळले; ६५ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:33+5:302021-03-20T04:16:33+5:30

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरेानाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारीही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात ...

215 infected during the day; 65 people defeated Corona | दिवसभरात २१५ बाधित आढळले; ६५ जणांची कोरोनावर मात

दिवसभरात २१५ बाधित आढळले; ६५ जणांची कोरोनावर मात

Next

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरेानाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारीही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात जिल्ह्यात २१५ बाधितांची नोंद झाली. त्यामध्ये तब्बल १६५ रुग्ण परभणी शहर व तालुक्यातील आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यात २०, पालममध्ये ४, सेलू तालुक्यात ९, गंगाखेड तालुक्यात ३, मानवत, सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळला आहे. याशिवाय औरंगाबाद, जालना, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील रुग्णही परभणीत बाधित आढळले आहेत. शुक्रवारी ६५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार १५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ९ हजार ६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३४७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आरोग्य संस्थांमध्ये जिल्ह्यात सद्य:स्थितीत ७४४ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथे आढळले रुग्ण

परभणी शहरातील सुपर मार्केट, गांधी पार्क, रेल्वे स्टेशन, रामकृष्णनगर, आरटीओ, चेकपोस्ट नाका, जिंतूर रोड, आशीर्वादनगर, आनंदनगर, सहकारनगर, विद्यानगर, शिवाजी चौक, त्रिमूर्तीनगर, एसटी महामंडळ, शांतिनिकेतन कॉलनी, एकतानगर, शनिवार बाजार, सुभेदारनगर, वजिराबादनगर, प्रभावतीनगर, शिवानंद कॅफे, आर्वी, टीव्हीएस शोरूम, आकार शॉपी, माउलीनगर, हर्षनगर, गुलमोहर हॉटेलजवळ संत सेनानगर, शिवाजीनगर, धार रोड, मेन रोड, रामनगर, गव्हाणे रोड, वसमत रोड, कृषी सारथी कॉलनी, गजानननगर, टाकळी, अमेयनगर, भाग्यलक्ष्मीनगर, दत्तधाम रोड, दादाराव प्लॉट, कच्छी बाजार, साखला प्लॉट, बालाजीनगर, सोन्ना, कोमटी गल्ली, अंबिकानगर, निरस नेत्रालय, विष्णूनगर, दैठणा, गंगाखेड येथील डॉक्टर लेन, रामनगर, जिंतूर येथील मेन रोड, खैरी प्लॉट, शिवाजीनगर, बलसा रोड, सेलू येथील शिक्षक कॉलनी, रेल्वे स्टेशन कॉलनी, गुगळी धामणगाव, पिंप्री, म्हाळसापूर, सेलू कॉर्नर, मानवत येथील शिवाजीनगर, सोनपेठ तालुक्यातील नरवाडी आदी ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Web Title: 215 infected during the day; 65 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.