जिल्ह्यात २२१ रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:12+5:302021-03-22T04:16:12+5:30

परभणी : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी जिल्ह्यात २२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान ...

221 patients in the district; Death of both | जिल्ह्यात २२१ रुग्ण; दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात २२१ रुग्ण; दोघांचा मृत्यू

Next

परभणी : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी जिल्ह्यात २२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडल्यानंतर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. २१ मार्च रोजी आरोग्य विभागाला १ हजार ५५९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या १ हजार ३३७ अहवालात १४८ जण पॉझिटिव्ह आहेत. तर रॅपिड टेस्टच्या २२२ अहवालांमध्ये ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेसह एका पुरुषाचा रविवारी कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यूचे सत्रही कमी होत नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण १० हजार ६९६ रुग्ण संख्या झाली असून, त्यापैकी ९ हजार ५१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ३५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८३२ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटी हॉस्पिटलमध्ये १३४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ४९६ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: 221 patients in the district; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.