२४ शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:09+5:302021-03-04T04:31:09+5:30
वस्सा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील २४ शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. ...
वस्सा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील २४ शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. पोकरा योजनेंतर्गत वस्सा येथील २ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर ३ शेतकऱ्यांना विहिरीसाठी २ लाख ५० हजार रुपयांचे तर रोटावेटरसाठी ४२ हजार रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत मिळणार आहे. त्याचबरोबर १ शेतकऱ्याला मिनी दालमीलचा लाभ मिळणार असून त्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर ५ शेतकऱ्यांना तुषार , ५ शेतकऱ्यांना ठिबकसाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जाणार आहे. फळबाग लागवडीसाठी ५ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख ९ हजार ७२० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर संत्रा या फळपिकांसाठी १२ शेतकऱ्यांना ७० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. असे एकूण २४ शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाईल. तसेच या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच या अनुदानाची रक्कम जमा केली, जाईल अशी माहिती कृषी सहाय्यक संभाजी वाघमारे यांनी दिली.