२५ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:29+5:302021-03-16T04:18:29+5:30

१ लाख ४२ हजार नागरिकांच्या जिल्ह्यात तपासण्या परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७१३ नागरिकांच्या कोरोना तपासण्या ...

25 patients coronary free | २५ रुग्ण कोरोनामुक्त

२५ रुग्ण कोरोनामुक्त

Next

१ लाख ४२ हजार नागरिकांच्या जिल्ह्यात तपासण्या

परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७१३ नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. ८१ हजार ५६९ नागरिकांच्या तपासण्या आरटीपीसीआरच्या साह्याने तर ६१ हजार १४४ नागरिकांच्या तपासण्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टच्या साह्याने झाल्या आहेत. एकूण तपासणी केलेल्या नागरिकांपैकी १ लाख ३२ हजार ७१३ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत सद्यस्थितीला. 593 नागरिकांचे अहवाल अनिर्णायक असून १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत

सोमवारी दिवसभरात १३०० तपासण्या

परभणी : कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी प्रशासनाने तपासण्यांवर भर दिला आहे. सोमवारी दिवसभरात १ हजार ३६० नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. येथील जिल्हा रुग्णालयात २७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ७१, अस्थिव्यंग रूग्णालयात ७, स्त्री रुग्णालयात ७, परभणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १४१, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात ३९, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४९, पालम येथील ग्रामीण रुग्णालयात २६, पालम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १९६, सोनपेठ ग्रामीण रुग्णालय ९, सोनपेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८८, पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात ८४, सेल उपजिल्हा रुग्णालयात १३, सेलू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६१, मानवत तालुक्यात १८४, जिंतूर तालुक्यात ७१ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: 25 patients coronary free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.