जिल्ह्यात २७ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:08+5:302021-02-16T04:19:08+5:30
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरही ...
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र स्थिर राहिली होती. त्यामुळे नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाली; परंतु मागील तीन दिवसांपासून हा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात २५२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १७ रुग्णांची नोंद झाली. १४ फेब्रुवारी रोजी १६८ जणांच्या अहवालात २६ रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ५४६ जणांच्या अहवालामध्ये २७ रुग्णांची भर पडली आहे. ७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४७ होती. आज ती ११४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ८ हजार १२० रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ७ हजार ६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३१८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ११४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात आयटीआय हॉस्पिटलमध्ये १७, खासगी रुग्णालयांमध्ये ११ आणि हाम आयसोलेशनमध्ये ७९ रुग्णांचा समावेश आहे.