२९३ मतदान केंद्राध्यक्ष,अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:17 AM2020-12-31T04:17:57+5:302020-12-31T04:17:57+5:30
यावेळी उपजिल्हाधिकारी ब्रिजलाल बिबे, तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय खरबडे, ...
यावेळी उपजिल्हाधिकारी ब्रिजलाल बिबे, तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय खरबडे, सहाय्यक बीडीओ डी.एस. अहिरे, नायब तहसीलदार जयसिंग बहुरे,उपमुख्य अधिकारी अक्षय पल्लेवाड, किरण देशमुख, मुकुंद आष्टीकर, राम मैफळ यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात तहसीलदार शेवाळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामपातळीवरील महत्त्वाची निवडणूक आहे. मतदान प्रक्रियेत केंद्राध्यक्षांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजण्यापूर्वी मतदान प्रतिनिधी समवेत मापपोलची प्रक्रिया यशस्वी करावी. त्यानंतर ७:३० वाजता मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवावेत, असे आव्हान यावेळी त्यांनी केले. त्यानंतर मास्टर ट्रेनर संतोष मलसटवार यांनी मतदान यंत्र, बाय लॉट वोटिंग मशीन हाताळण्याची माहिती प्रोजेक्टद्वारे दिली. ९९३ पैकी ९३३ कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते. गैरहजर ६० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल,असे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितले. त्यानंतर ६ जानेवारी रोजी दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.