१२ तासाच्या आत ३ चोरटे जेरबंद; कोतवालीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
By मारोती जुंबडे | Published: July 23, 2023 01:49 PM2023-07-23T13:49:42+5:302023-07-23T13:50:13+5:30
परभणी शहरातील काकडे नगर परिसरात २१ जुलै रोजी हयवा क्रमांक एमएच २६ बीई २६२२ या क्रमांकाचा उभा केला होता.
परभणी: शहरातील काकडे नगर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी हयवा लंपास केल्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थागुशा व कोतवाली पोलिसांच्या संयुक्त पथकाने १२ तासाच्या आत पाठलाग करत तीन चोरटे जेरबंद केले.
परभणी शहरातील काकडे नगर परिसरात २१ जुलै रोजी हयवा क्रमांक एमएच २६ बीई २६२२ या क्रमांकाचा उभा केला होता. मात्र २२ जुलै रोजी हा हायवा दिसून आला नाही. याबाबतची शेख उबेद शेख हमीद यांनी फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक व्ही.डी.चव्हाण, शरद जऱ्हाड, नागनाथ तुकडे, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, अजित बिराजदार, गोपीनाथ वाघमारे यांनी हयवा चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे सुरू केले. त्यानंतर या पथकास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत सय्यद मतीन सय्यद रशीद (३०, रा. आनंद नगर, परभणी), शंकर बाबाराव बुधवंत, अब्दुल रहमान नागतिलक (रा. आंबेडकर नगर, धार रोड, परभणी) या तीन संशयित इसमांना पाठलाग करून चोरीस गेलेल्या हायवासह अवघ्या १२ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले.
वाशिमहूनही चोरला ऑटो व दुचाकी
स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांच्या पथकाने चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची आधिक चौकशी केली असता त्यांनी काकडे नगर येथील हयवासह वाशिम येथून एक ऑटो व एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.