शेतकऱ्यांच्या नावे बनावट खाते काढून ३० लाखांचा अपहार; दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:18 PM2019-07-29T13:18:13+5:302019-07-29T13:22:14+5:30

३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून अनुदान लाटले

30 lakhs fraud in the the name of farmers; two arrested | शेतकऱ्यांच्या नावे बनावट खाते काढून ३० लाखांचा अपहार; दोन अटकेत

शेतकऱ्यांच्या नावे बनावट खाते काढून ३० लाखांचा अपहार; दोन अटकेत

Next
ठळक मुद्देप्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत भ्रष्टाचार

पूर्णा (जि. परभणी) : तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे. हरीश वंजे आणि कृषी सहायक श्याम यशमोड, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन संचासाठी पूर्णा येथील कृषी कार्यालयात कुठलाही अर्ज केला नसताना तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील शेतकरी सूर्यभान गंगाधर लोखंडे यांच्या नावे बोगस कागदपत्र तयार करून संच व त्यावरील मिळणारे २४ हजार ९८० रुपयांचे अनुदान परस्पर उचलण्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता. 

याप्रकरणी सूर्यभान लोखंडे यांनी परभणी येथील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. यानुसार पूर्णा पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. फौजदार चंद्रकांत पवार यांनी सखोल तपास केला असता, पूर्णा तालुक्यात या योजनेंतर्गत अशाच पद्धतीने ३०६ शेतकऱ्यांचे कागदपत्रे तयार करून ताडकळस येथील बँकेत बनावट खाते उघडून तब्बल तीस लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्याचे निष्पन्न झाले होते.

Web Title: 30 lakhs fraud in the the name of farmers; two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.