निवडणूक खर्च सादर करण्यास ३० ग्रा. पं. तील उमेदवारांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:59+5:302021-01-22T04:16:59+5:30
या ग्रामपंचायतीतील उमेदवारांची चालढकल सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव, कन्हेरवाडी, साळेगाव, हातनूर, सोन्ना, खवणे पिंपरी, लाडनांदरा, देऊळगाव गात, कुडा, गोंडगे पिंपरी, ...
या ग्रामपंचायतीतील उमेदवारांची चालढकल
सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव, कन्हेरवाडी, साळेगाव, हातनूर, सोन्ना, खवणे पिंपरी, लाडनांदरा, देऊळगाव गात, कुडा, गोंडगे पिंपरी, ब्रह्मवाकडी, करजखेडा, गोमेवाकडी, सावंगी, पी. सी. डिग्रस, राजा, काजळी रोहिणा, पिंपळगाव गोसावी, शिराळा, रायपूर, चिकलठाणा, खादगाव, सिमणगाव, गव्हा, कान्हड, आडगाव दराडे, हट्टा, निपाणी टाकळी, करडगाव, नागठाणा या गावांमधील उमेदवारांनी तहसील कार्यालयाकडे खर्च सादर केलेला नाही. या संदभार्तील नोटीस उपकोषागार कार्यालयाच्या बोर्डावर डकविण्यात आली आहे.
‘ ज्या उमेदवारांनी दैनिक खर्च सादर केला नाही. त्यांनी तत्काळ खर्च सादर करावा तसेच निकालापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक लढविलेल्या व बिनविरोध निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराने मुद्रांकावर शपथपत्र व भाग १ आणि प्रपत्र १ आणि प्रपत्र अ व ब तसेच खर्चाच्या मूळ पावतीसह अंतिम मुदतीत अर्ज सादर करावा. मुदतीत अर्ज सादर न करणाऱ्या उमेदवारांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल.’
-जी. बी. चव्हाण, उपकोषागार अधिकारी तथा खर्च तपासणी पथक प्रमुख, सेलू