परभणीत ३१ कि.मी.ची विभागीय सायकल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:29 AM2018-11-26T00:29:59+5:302018-11-26T00:30:55+5:30
परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़
या स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ़ सुरेश देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ़ विलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी, प्राचार्य डॉ़ बी़ यू़ जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस २ हजार रुपये दिले जाणार आहे़ तसेच पाच ते सातव्या क्रमांकावरील विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल़ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बाहेरगावच्या खेळाडुंची निवास व भोजन व्यवस्था संयोजन समितीने केली आहे़ २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बी़ रघुनाथ महाविद्यालयात खेळाडुंची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे़ तेव्हा खेळाडूंनी २६ नोव्हेंबरपर्यंत रणजीत काकडे, प्रा़ डॉ़ विनोद गणाचार्य यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख डॉ़ विवेक नावंदर, निलेश पटेल, प्राचार्य डॉ़ विलास सोनवणे, डॉ़ विनोद मंत्री, प्रा़ डॉ़ माधव शेजूळ, डॉ़ ज्ञानेश्वर पंडित, डॉ़ पवन चांडक, गोविंद शर्मा आदींनी केले आहे़
एक दिन सायलिंग उपक्रम
या स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील नागरिकांना दैनंदिन सायकलिंगची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने एक दिन सायकलिंग हा उपक्रमही राबविला जाणार आहे़ या उपक्रमांतर्गत परभणी शहरात ६ किमी अंतराची सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे़ २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७़३० वाजता या उपक्रमांतर्गत बी़ रघुनाथ महाविद्यालयापासून सायकलिंगला सुरुवात केली जाणार आहे़