३१ गावे पोलीस पाटलाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:47+5:302021-02-18T04:29:47+5:30

सेलू तालुक्यातील ९५ गावे ही ४ पोलीस ठाण्याला जोडली गेली आहेत. यामध्ये सेलू पोलीस ठाण्याअंतर्गंत ५९ गावे तर चारठाणा ...

31 villages without police patrol | ३१ गावे पोलीस पाटलाविना

३१ गावे पोलीस पाटलाविना

googlenewsNext

सेलू तालुक्यातील ९५ गावे ही ४ पोलीस ठाण्याला जोडली गेली आहेत. यामध्ये सेलू पोलीस ठाण्याअंतर्गंत ५९ गावे तर चारठाणा पोलीस ठाण्यामध्ये २४ गावे, बोरी पोलीस ठाण्यामध्ये १० गावे तर पाथरी पोलीस ठाण्यामध्ये २ गावांचा सामावेश करण्यात आला आहे. गावकीच्या भांडण तंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असल्याने त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते. परंतु, सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत १८ गावे तर चारठाणा पोलीस स्टेशन अंतर्गत ११ गावे तर पाथरी व बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येकी १ गाव अशा ३१ गावातील पोलीस पाटील पद हे आजघडीला रिक्त आहे. त्यामुळे या गावातील कायदा-सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे आदी कामे या गावात विस्कळीत झाली आहेत. सेलू उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सेलू तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरीता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र, तशी कोणतीही प्रकिया होताना दिसून येत नाही.

या गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त

सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रिंप्रुळा, ढेंगळी पिंपळगाव, खादगांव, खुपसा, कुंडी, ब्राम्हणगांव प्र. को.,डुघरा, राजा, राजवाडी, डिग्रस खु.,साळेगांव, खेर्डा दु. की, ब्रम्हवाकडी, रायपूर, तिडी पिंपळगाव, सिध्दनाथ बोरगांव, गोहेगांव, डिग्रस जहाँगीर, बोरी पोलीस ठाण्यातर्गंत कुपटा तसेच चारठाणा पोलीस ठाण्याअंतर्गत वाई,गोंडगे पिंपरी, सिंगठाळा, देवगांवफाटा, बोरकीनी, निरवाडी बु., निरवाडी खु, सावंगी पि.सी., गिरगांव खु., गिरगांव बु., केमापुर तर पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत लाडनांदरा या गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत.

पोलीस पाटील रिक्त पदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरावरून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

उमाकांत पारधी,उपविभागीय अधिकारी, सेलू

Web Title: 31 villages without police patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.