जिल्ह्यात ३३ कोरोना रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:40+5:302021-06-29T04:13:40+5:30

कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्याचप्रमाणे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूदेखील कमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. ...

33 corona patients registered in the district | जिल्ह्यात ३३ कोरोना रुग्णांची नोंद

जिल्ह्यात ३३ कोरोना रुग्णांची नोंद

Next

कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्याचप्रमाणे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूदेखील कमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. सोमवारी आरोग्य विभागाला १ हजार ४८५ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ३५३ अहवालांमध्ये २४ आणि रॅपिड टेस्टच्या १३२ अहवालांमध्ये ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५० हजार ८६६ झाली असून ४९ हजार २८४रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २८१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ३०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी दिवसभरात १४८५ अहवालांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३५३ आरटीपीसीआर चाचणी तर १३२ अँटिजन चाचणी करण्यात आल्या. यापैकी १४५० अहवाल निगेटिव्ह तर ३३ अहवाल पॉझिटिव्ह व दोन अहवाल अनिर्णायक ठेवण्यात आले आहेत. तसेच १४१ नमुने नाकारण्यात आले आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत.

Web Title: 33 corona patients registered in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.