परभणी जिल्ह्यात ३३ कोटींचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:21 AM2018-12-27T00:21:09+5:302018-12-27T00:21:51+5:30
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़
यावर्षीच्या रबी हंगामामध्ये जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित करून दिले आहे़ परंतु, प्रत्यक्षात पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, या बँकेने ३४७ शेतकºयांना १ कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये (१़८६ टक्के) कर्ज वाटप केले आहे़
व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, या बँकांनी आतापर्यंत १२ कोटी ८९ लाख रुपये (६़२२ टक्के) कर्ज वाटप केले़ तर ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून, या बँकेने १८ कोटी ६८ लाख २४ हजार रुपयांचे (५८़७१ टक्के) पीक कर्ज वितरित केले आहे़ रबी हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे़ विशेष म्हणजे पाथरी शहरामध्ये रबी पीक कर्जासाठी शेतकºयांना आंदोलन करावे लागले होते़ बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़