परभणी जिल्ह्यात ३३ रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:23 AM2021-02-27T04:23:46+5:302021-02-27T04:23:46+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून वाढत आहे. गुरुवारी ४१ बाधितांची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यामध्ये काही प्रमाणात ...
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून वाढत आहे. गुरुवारी ४१ बाधितांची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यामध्ये काही प्रमाणात घट झाली. दिवसभरात ३३ कोरोना बाधित रुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. त्यामध्ये परभणी शहर व तालुक्यातील २४ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित रुग्णांमध्ये पूर्णा, पालम, जिंतूर तालुक्यातील तसेच हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका बाधित पुरुषाचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ४४८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ७ हजार८८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ३२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या आरोग्य संस्थांमध्ये २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.