पहिल्याच दिवशी कापूस विक्रीसाठी ३५० वाहने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:25+5:302020-12-15T04:33:25+5:30
सोनपेठ : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १४ डिसेंबर रोजी शहरातील मीनाक्षी व राजेश्वर जिनिंगमध्ये सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी सुरू करण्यात ...
सोनपेठ : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १४ डिसेंबर रोजी शहरातील मीनाक्षी व राजेश्वर जिनिंगमध्ये सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी सुरू करण्यात आली. या कापूस खरेदीचे उद्घाटन जि.प.च्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते झाले. पहिल्याच दिवशी ३५० वाहनांद्वारे शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला होता.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना खाजगी बाजारात कवडीमोल दराने कापूस विक्री करावा लागला. मात्र १४ डिसेंबरपासून शहरातील दोन जिनिंगमध्ये सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ३५० वाहनांतून शेतकऱ्यांनी या दोन जिनिंगवर कापूस विक्रीस आणला होता. यावेळी कापसाला ५ हजार ७२५ रुपयांचा भाव मिळाला. कापूस विक्रीसाठी आणलेल्या पहिल्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी दशरथ सूर्यवंशी, मधुकर निरपणे, बालाप्रसाद मुंदडा, रमाकांत जहांगीरदार, शिवाजी मव्हाळे, ॲड. श्रीकांत विटेकर, दिगंबर पाटील, अशोक यादव, राम बेद्रे, रंगनाथ सोळंके, सुनील रेवडकर यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिवाजी गिणगिणे, अशोक भोसले, सय्यद हरुण, बळीराम भोसले, गणेश घुले, विश्वंभर रोडे, शेख अजीम आदींनी प्रयत्न केले.