परभणीतील ४० वसाहती अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:38 AM2018-04-29T00:38:43+5:302018-04-29T00:38:43+5:30
वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची तार तुटल्याने देशमुख हॉटेल कारेगाव रोड भागातील सुमारे ३० ते ४० वसाहतींमधील वीज पुरवठा शनिवारी खंडित झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची तार तुटल्याने देशमुख हॉटेल कारेगाव रोड भागातील सुमारे ३० ते ४० वसाहतींमधील वीज पुरवठा शनिवारी खंडित झाला होता.
परभणी शहराला वीज पुरवठा करणाºया मुख्य वीज वाहिनीचे कंडक्टर तुटल्याने दुपारी ३ वाजेच्या सुमारास ३० ते ४० वसाहतींचा वीज पुरवठा खंडित झाला. शहरातील रविराज पार्क पार्वतीनगर या भागातून जाणारी हाय टेंशन वाहिनीची तार तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. शनिवारी उन्हाचा पारा चांगलाच तापला होता. कडक उन्हामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्यात दिवस काढावा लागला. दरम्यान, महावितरणचे २० ते २५ कर्मचारी दुपारपासून दुरुस्तीच्या कामात गुंतले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्ती सुरु होती. रात्री ८ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.