परभणी जिल्ह्यात ४२ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:20 AM2019-04-11T00:20:16+5:302019-04-11T00:20:39+5:30
जिल्ह्यात पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, टंचाईग्रस्त गावांतील ४२ हजार ६०० ग्रामस्थांना ३० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, टंचाईग्रस्त गावांतील ४२ हजार ६०० ग्रामस्थांना ३० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़
मागील अनेक वर्षांच्या तुनलेत यावर्षी पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे़ आॅक्टोबर महिन्यापासूनच ग्रामीण भाग टंचाईने होरपळत असून, या ग्रामस्थांना प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे़ गाव पातळीवरील जलस्त्रोत आटल्याने पाण्याची टंचाई वाढली आहे़ विशेष म्हणजे यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने भूजल पातळी झपाट्याने खोल गेली़ परिणामी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे़
सद्यस्थितीला पालम तालुक्यात सर्वाधिक ८ टँकर सुरू आहेत़ या तालुक्यातील ६ गावे आणि दोन वाड्यांमध्ये १३ हजार २६५ ग्रामस्थांना टँकरचे पाणी पुरविले जात आहे़ त्याखालोखाल पूर्णा तालुक्यातील ३, सेलू तालुक्यातील ६ गावांना प्रत्येकी ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे तर गंगाखेड तालुक्यातील १, सोनपेठ तालुक्यातील २ गावांना प्रत्येकी २ टँकर सुरू झाले आहेत़
सद्यस्थितीला २२ खाजगी आणि ८ शासकीय अशा ३० टँकरच्या सहाय्याने २१ गावे व ५ वाडीतांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे़ तसेच प्रशासनाने एकूण १७६ खाजगी विहिरीचे अधिग्रहण केले असून, त्यातील २६ विहिरी केवळ टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत तर १५० विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आले आहेत़
या गावांना टँकर सुरू
४पालम तालुका : चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामपूर तांडा, पेंडू खु़, सादलापूर, पेंडू बु़, बंदरवाडी़
४पूर्णा तालुका : पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव़
४गंगाखेड तालुका : गोदावरी तांडा, उमला नाईक तांडा़
४सोनपेठ तालुका : नरवाडी, कोथळा़
४सेलू तालुका : तळतुंबा, वालूर, पिंपरी गोंडगे, नागनाठा कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड़
४जिंतूर तालुका : मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा़