४३ महिला सरपंच, शेतकऱ्यांचा ‘महावितरण’कडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:36+5:302021-03-10T04:18:36+5:30
यानिमित्त आयोजित कार्यक्रमास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देवीदास पवार, अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांची ...
यानिमित्त आयोजित कार्यक्रमास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देवीदास पवार, अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील कृषीपंपाची वीजदेयक थकबाकी भरून थकबाकीमुक्त झालेल्या १३ महिला शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीत सहकार्य करणाऱ्या १० महिला सरपंचांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वीजबिल वसुलीत विशेष कार्य करणाऱ्या २० महिला जनमित्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी मुगळीकर यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्वाची माहिती असलेल्या पुस्तिका तसेच जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर, टी शर्ट, कॅप व मास्कचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांसाठी लाभदायक असलेल्या ऊर्जापर्वाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कार्यकारी अभियंता के. एन. जमदाडे, आर. जी. लोंढे, सहाय्यक अभियंता विवेक लांडगे आदींनी परिश्रम घेतले.