परभणी जिल्ह्यात ४९ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:04+5:302021-06-19T04:13:04+5:30

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ४ हजार २३६ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला ...

49 patients registered in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ४९ रुग्णांची नोंद

परभणी जिल्ह्यात ४९ रुग्णांची नोंद

Next

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ४ हजार २३६ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यामध्ये ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ११ जण परभणी शहरातील आहेत. याशिवाय पूर्णा तालुकयातील ६, सेलू, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी ४, गंगाखेड, मानवत, पालम तालुक्यातील प्रत्येकी २ व जिंतूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. याशिवाय हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्यातील रुग्णांची नोंदही परभणीत झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान एका पुरुषाचा शुक्रवारी मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्यांपैकी एकाही रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ४८ हजार ९३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार २७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ३८० जण सध्या आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: 49 patients registered in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.