परभणी शहरात ५० किलो कॅरिबॅग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:59 PM2019-05-09T23:59:30+5:302019-05-10T00:00:04+5:30
महापालिकेच्या पथकाने गुरुवारी शहरात मोहीम राबवून नवा मोंढा परिसरात ५० किलो कॅरिबॅग जप्त केल्या. या कारवाईत ५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेच्या पथकाने गुरुवारी शहरात मोहीम राबवून नवा मोंढा परिसरात ५० किलो कॅरिबॅग जप्त केल्या. या कारवाईत ५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
प्लास्टिक आणि कॅरिबॅगच्या वापराला राज्यात बंदी घातली असून असे असतानाही शहरामध्ये सर्रास कॅरिबॅगचा वापर होत असल्याने याविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेने ३ पथकांची स्थापना केली आहे. गुरुवारी पथकप्रमुख करण गायकवाड, विनय ठाकूर, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, काकडे, शेख रफीक, श्रावण कदम आदींनी नवा मोंढा परिसरात मोहीम राबविली. त्यावेळी व्यापाऱ्यांकडून ५० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. शहरातील होलसेल व्यापारी तसेच किरकोळ विक्रेत्यांना महापालिकेने यापूर्वी नोटीस बजावून कॅरिबॅगचा वापर करु नये, अशा सूचना केल्या होत्या; परंतु, तरीही सर्रास कॅरिबॅग वापरल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही मोहीम राबविण्यात आली. यापुढे कॅरिबॅग आढळल्यास दंड लावून कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.