परभणी जिल्ह्यात ५२ हजारांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:32 AM2018-04-15T00:32:01+5:302018-04-15T00:32:01+5:30
शहर व ग्रामीण भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर पोलिसांनी पाच ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून ५२ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : शहर व ग्रामीण भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर पोलिसांनी पाच ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून ५२ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली.
जिंतूर शहर व तालुक्यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही अवैध दारू विक्रेते एक दिवस अगोदर देशी, विदेशी दारुचा अवैध साठा करणार असल्याची माहिती जिंतूर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाची स्थापना केली़ या पथकाने शहरासह तालुक्यातील केहाळ, येलदरी, भोगाव व बोरी या पाच ठिकाणावर धाड टाकली़ यावेळी युवराज अंभुरे, शेख मुसा, सखाराम काळे, विजय जैस्वाल, हिरालाल जैस्वाल या पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील ५२ हजार रुपये किंमतीची देशी व विदेशी दारू जप्त केली़ आरोपीविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ही कारवाई सपोनि शेख, पोउपनि नरवाडे, कानगुले, काकडे, अजगर, सूर्यवंशी आदींनी केली़