ग्रामपंचायतीसाठी ५४ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:51+5:302020-12-25T04:14:51+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे एका उमेदवाराने अर्ज ...

54 candidature applications filed for Gram Panchayat | ग्रामपंचायतीसाठी ५४ उमेदवारी अर्ज दाखल

ग्रामपंचायतीसाठी ५४ उमेदवारी अर्ज दाखल

Next

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे एका उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. गुरुवारी परभणी तालुक्यात १३, जिंतूर तालुक्यात ७, पूर्णा तालुक्यात ४, सेलू ११, मानवत २, पाथरी ५, सोनपेठ ७, गंगाखेड १ आणि पालम तालुक्यात ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परभणी तालुक्यातील मांडाखळी ग्रामपंचायतीमध्ये ९, कुंभारी ग्रामपंचायतीत ३ तर एकुरखा तर्फे पेडगाव ग्रामपंचायतीत १ उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. सेलू तालुक्यात एकूण ११ अर्ज दाखल झाले. त्यात चिकलठाणा बु. ३, चिकलठाणा खु. ३, रायपूर ३, खेर्डा १ आणि नागठाणा ग्रामपंचायतीत १ अर्ज दाखल झाला. जिंतूर तालुक्यातील करवली येथे ३ आणि चारठाणा येथे ४ असे ७ अर्ज, पालम तालुक्यात २ ग्रामपंचायतीसाठी २ अर्ज, सोनपेठ तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीत ४ तर लासिना ग्रामपंचायतीत ३ असे ७ अर्ज दाखल झाले आहेत. गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव ग्रामपंचायतीत १, मानवत तालुक्यातील सोमठाणा, राजुरा आणि आटोळा ग्रुप ग्रामपंचायत आणि गोगलगाव ग्रामपंचायतीत प्रत्येकी १ असे २ अर्ज दाखल झाले आहेत. पाथरी तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दोन दिवस सुटीचे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटीचे आल्याने सोमवारीच अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

Web Title: 54 candidature applications filed for Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.