सेलूत पंधरा दिवसात ५ वी घरफोडी; गुलमोहर कॉलनीत सशस्त्र दरोड्यात ६ लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 12:39 PM2021-10-28T12:39:06+5:302021-10-28T12:39:44+5:30

घराच्या छतावर चढून जिन्याचा दरवाजा तोडत घरात ५ ते ६ चोरट्यांनी प्रवेश केला.

5th burglary in 15 days in Selu; In an armed robbery in Gulmohar Colony, Rs 6 lakh was looted | सेलूत पंधरा दिवसात ५ वी घरफोडी; गुलमोहर कॉलनीत सशस्त्र दरोड्यात ६ लाखांचा ऐवज लुटला

सेलूत पंधरा दिवसात ५ वी घरफोडी; गुलमोहर कॉलनीत सशस्त्र दरोड्यात ६ लाखांचा ऐवज लुटला

googlenewsNext
ठळक मुद्देचोरट्यांनी महिला, लहान मुलांसह सर्वाना मारहाण केली.

देवगावफाटा (परभणी) : सेलू शहरातील गुलमोहर कॉलनी येथील  शेख सिध्दीकी शेख मोईन बागवान यांच्या घरी आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. चोरट्यांनी धमकावत महिलांना मारहाण करत सोने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाखांचा ऐवज पळवला आहे. 

सिध्दीकी शेख मोईन बागवान हे आपल्या भावासह गुलमोहर कॉलनी येथे राहतात. आज पहाटे ३ वाजेच्या सुमाराला चार ते पाच चोरट्यांनी छतावरील जिन्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील सर्व खोल्यांना कडी लावली. दरम्यान, एका खोलीत प्रवेश करीत चोरट्यांनी महिलांना चाकूचा धाक दाखवत अंगारील व घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेतली. 

दरम्यान, घरातील इतरांना जाग आल्याने चोरट्यांनी त्यांना मारहाण करत तेथून पळ काढला. घरातील सदस्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक करत चोरटे तेथून पसार होण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी कर्मचाऱ्यासह दाखल होत पंचनामा करून पाहणी केली. चोरट्यांनी जवळपास ५ लाखाचे सोने व रोख १ लाख रक्कम चोरून नेली. चोरट्यांजवळ तलवार, गुप्ती, चाकू असे धारदार शस्त्र होते. त्यांनी लहान मुल़ासह सर्वाना मारहाण केली. यामध्ये सिध्दीक बागवान यांचे दात पडले तर रजीया बेगम यांच्या नाकाला जखम झाली आहे. 

सेलू शहरात पंधरा दिवसात ही ५ वी घरफोडी आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या घरफोडीच्या घटना रोखून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Web Title: 5th burglary in 15 days in Selu; In an armed robbery in Gulmohar Colony, Rs 6 lakh was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.