एकाच रस्त्यावर ११ दिवसांत ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:38+5:302020-12-26T04:13:38+5:30

परभणी: गंगाखेड-परळी रस्त्यावर गेल्या ११ दिवसांत ३ अपघातांत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातांची ...

6 killed in 11 days on the same road | एकाच रस्त्यावर ११ दिवसांत ६ जणांचा मृत्यू

एकाच रस्त्यावर ११ दिवसांत ६ जणांचा मृत्यू

Next

परभणी: गंगाखेड-परळी रस्त्यावर गेल्या ११ दिवसांत ३ अपघातांत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने २६ ते ३१ दरम्यान वाहनांच्या कागदपत्रे तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे. गंगाखेड-परळी रस्त्यावर सातत्याने अपघात होण्याच्या घटना वाढत आहेत. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता करम पाटीजवळ हायवा टिप्पर व ऑटोच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास वडगाव पाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलोरो जीपने दिलेल्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. २४ डिसेंबर रोजी करम पाटीजवळच परळीकडे ऊस घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॅलीच्या ट्रॅक्टरने महिलेला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. या तिन्ही घटना भरघाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे घडल्या आहेत. त्यामुळे या घटनांची गंभीर नोंद प्रशासकीय पातळीवर घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत वाहन तापसणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत वाहनांची कागदपत्रे तपासणी, वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा विमा, पीयुसी व वाहन संबंधाने इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहने चालविताना वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा, मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, वैध परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये, वाहतून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांनी केले आहे.

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

महामार्ग पोलिसांच्या तपासणी मोहिमेत वाहनाची वेग मर्यादादेखील तपासण्यात येणार आहे. जड वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा ६० कि.मी. तर जीप, कार, ऑटोरिक्षा, दुचाकी आदी हलक्या वाहनांसाठी वेगमर्यादा ७० कि.मी. वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: 6 killed in 11 days on the same road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.