परभणीत ६ महिन्यांचा औषधीसाठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:26 AM2020-01-01T00:26:02+5:302020-01-01T00:26:50+5:30

जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सरत्या वर्षाने नवीन वर्षाची भेट दिली असून या रुग्णांसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिने पुरेल एवढा औषधीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या रुग्णांवर आता परभणीतच उपचार मिळू शकणार आहेत.

6 months free medicines available at Parbhani | परभणीत ६ महिन्यांचा औषधीसाठा उपलब्ध

परभणीत ६ महिन्यांचा औषधीसाठा उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सरत्या वर्षाने नवीन वर्षाची भेट दिली असून या रुग्णांसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिने पुरेल एवढा औषधीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या रुग्णांवर आता परभणीतच उपचार मिळू शकणार आहेत.
थॅलेसेमिया मेजर हा गंभीर स्वरुपाचा आजार असून हा आजार जडलेल्या रुग्णांना प्रत्येक महिन्यातून किमान एकदा रक्त पुरवठा करावा लागतो. शरीरामध्ये रक्त तयार करणाऱ्या पेशी निर्माण होत नसल्याने या रुग्णांना बाहेरुन रक्त घेऊन जीवन जगावे लागते. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात असा आजार असणारे सुमारे दीडशे रुग्ण आहेत. या रुग्णांना रक्त पुरवठ्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात डे केअर सेंटर कार्यरत आहे. त्याच बरोबर थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप स्थापन झाला असून या ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांच्यासह शहरातील डॉक्टर्स थॅलेसेमिया रुग्णांसाठी सातत्याने प्रयत्न करतात.
थॅलेसेमिया आजार झालेल्या रुग्णांना नियमित रक्त पुरवठ्याबरोबरच काही औषधीही नियमितपणे घ्यावी लागतात. साधारणत: प्रत्येक महिन्यात ही औषधी रुग्णांना उपलब्ध करुन घ्यावी लागते. मात्र जिल्हास्तरावर सामान्य रुग्णालयात थॅलेसेमियाग्रस्तांसाठी औषधसाठा उपलब्ध नसल्याने परभणीतील काही खाजगी रुग्णालय किंवा औरंगाबाद नाशिक, मुंबई या ठिकाणाहून औषधी घ्यावी लागत होती. थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपने ही औषधी परभणीत उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात दिसून आला असून जिल्हा सामान्य रुग्णालयाला थॅलेसेमियाग्रस्तांसाठी लागणारा औषधीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गोरगरीब असणाºया या रुग्णांचा औषधीवर होणारा सुमारे ५ ते ६ हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे. याशिवाय मोठ्या शहरात जावून उपचार करण्यासाठी होणारी तारांबळही थांबणार आहे.
हिमोफेलियासाठीही : मिळाली औषधी
४थॅलेसेमिया बरोबरच हिमोफेलिया हा देखील गंभीर स्वरुपाचा आजार आहे. मराठवाड्यात या आजाराचे सुमारे ९० ते १०० रुग्ण आहेत. या आजारात विशिष्ट घटकाची कमतरता असल्याने जखम झाल्यास या रुग्णांचे रक्त गोठत नाही. परिणामी या जखमेतून रक्त वाहून जिवाला धोका निर्माण होतो.
४अशा रुग्णांना जखम झाल्यानंतर यापूर्वी थेट पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे उपचार घ्यावे लागत होते. त्यासाठी ३० ते ६० हजार रुपये किंमतीचे इंजेक्शन घ्यावे लागते. या रुग्णांसाठीही परभणीमध्ये हिमोफेलिया आजाराची औषधी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे परभणीसह मराठवाड्यातील रुग्णांचीही आता सुविधा झाली आहे.
२०० जणांची बोनमॅरो तपासणी
४थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपने वर्षभर या रुग्णांसाठी काम सुरु केले आहे. त्यातूनच अमेरिकेतील हिस्टोजेनिक लॅब आणि चेन्नई येथील दात्री इंटरनॅशनल फाऊंडेशनसोबत करार करण्यात आला आहे.
४या करारातूनच काही महिन्यांपूर्वी परभणीत घेतलेल्या शिबिरात राज्यातील २०० जणांची बोनमॅरो तपासणी करण्यात आली. यातून ३३ जणांचे बोनमॅरो जुळल्याने त्यांच्यावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
४विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील तिघांची बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही अवघड शस्त्रक्रिया वेल्लोर व पुणे येथे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे हे तीन रुग्ण थॅलेसेमिया मुक्त जीवन जगत आहेत, अशी माहिती लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी दिली.

Web Title: 6 months free medicines available at Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.