६ हजार शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:15+5:302020-12-05T04:27:15+5:30
पालम तालुक्यात १३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड केली आहे. अतिवृष्टी व बोंडअळीने कापूस उत्पादक हवालदिल झाले ...
पालम तालुक्यात १३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड केली आहे. अतिवृष्टी व बोंडअळीने कापूस उत्पादक हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी ऑनलाईन न केलेल्या शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कापसाची विक्री करावी लागली होती. नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा पाऊस सुरू होईपर्यंत विक्रीसाठी नंबर लागला नव्हता. मागील वर्षी वाईट अनुभव आल्याने यावर्षी शेतकरी सावधगिरी बाळगत आहेत. १ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समीतीकडे ५ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पालम तालुक्यात शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरीही शहरात एकही जिनींग खरेदीसाठी नाही. त्यामुळे गंगाखेड येथील २ जिनींग पालम तालुक्यासाठी स्वतंत्र नेमाव्यात अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.