परभणी जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांवर ग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:50 PM2019-06-23T23:50:04+5:302019-06-23T23:50:15+5:30
येथील जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध झाली असून, विविध प्रकारची ७० नियतकालिके, २५ वर्तमानपत्रे, सद्यस्थितीला या ग्रंथालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध झाली असून, विविध प्रकारची ७० नियतकालिके, २५ वर्तमानपत्रे, सद्यस्थितीला या ग्रंथालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी दिली़
येथील ग्रंथालय अधिकारी कार्यालयात नुकताच वाचन दिन कार्यक्रम पार पडला़ या प्रसंगी कथाकार राजेंद्र गहाळ, कवी उद्धव परभणीकर, चित्रपट दिग्दर्शक अशोक आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती़ कातकडे म्हणाले, केरळ राज्य शासनामार्फत १९६६ पासून १९ जून हा वाचन दिन म्हणून साजरा केला जात आहे़
यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनाचे उद्घाटन करताना वाचन अभिरुची वाढविण्यासाठी ३ कोटी लोकांपर्यंत वाचन उपक्रम पोहचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे़ याच अनुषंगाने परभणी शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी नवनवीन पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध केली आहेत़ शहरातील वाचकांसाठी सकाळी १०़३० ते ५़३० यावेळेत हे ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध आहे़ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कातकडे यांनी केले आहे़ कार्यक्रमात उद्धव परभणीकर यांनी कवितेचे सादरीकरण केले़ राजेंद्र गहाळ यांनी रांजनातील पाय ही विनोदी कथा सादर केली़
प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ़ एस़आऱ रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ बी़एस़ देवणे यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंभोनाथ दुभोळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले़ कार्यक्रमास विद्यार्थी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते़