जिल्ह्यात ६२ ऑक्सिजन खाटा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:19 AM2021-04-28T04:19:03+5:302021-04-28T04:19:03+5:30
जिल्ह्यात ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. आरोग्य विभागाने आयसीयूमध्ये ५४१ बेड उपलब्ध केले आहेत. त्यात ४२४ ...
जिल्ह्यात ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. आरोग्य विभागाने आयसीयूमध्ये ५४१ बेड उपलब्ध केले आहेत. त्यात ४२४ बेडवर ऑक्सिजनची सुविधा आहे. या ठिकाणी ६७ बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे स्वतंत्र ४९७ ऑक्सिजन बेड उपलब्ध केले असून, त्यातील ४३५ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. ६२ बेड रिक्त आहे. त्याचप्रमाणे २ हजार १३२ जनरल बेड जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यांपैकी ८८१ बेड रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची ऑक्सिजन बेडसाठी धावपळ होत होती. मात्र मागील दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे येथील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच ऑक्सिजनचा तुटवडा दूर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.