६३ टक्के झाले वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:41 AM2017-11-23T00:41:17+5:302017-11-23T00:41:33+5:30

शहरी भाग हागणदारीमुक्त करण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आले असले तरी वैयक्तीक शौचालयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मात्र अधिकाºयांना कसरत करावी लागत आहे़ नागरिकांमधील उदासिनतेमुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवूनही वैयक्तीक शौचालयाचे कामकाज जिल्ह्यात ६३ टक्क्यांपर्यंतच पोहचले आहे़

63 percent of personal toilet construction work | ६३ टक्के झाले वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम

६३ टक्के झाले वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरी भाग हागणदारीमुक्त करण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आले असले तरी वैयक्तीक शौचालयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मात्र अधिकाºयांना कसरत करावी लागत आहे़ नागरिकांमधील उदासिनतेमुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवूनही वैयक्तीक शौचालयाचे कामकाज जिल्ह्यात ६३ टक्क्यांपर्यंतच पोहचले आहे़
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र नावाने नागरी स्वच्छता अभियान सुरू केले़ या अभियानांतर्गत शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना हागणदारी मुक्तीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले़ परभणी जिल्ह्यात परभणी महानगरपालिका वगळता ७ नगरपालिका आणि १ नगर पंचायत अस्तित्वात आहे़ या सर्व शहरी भागात स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ या अभियानामध्ये पाथरी आणि सोनपेठ या दोन नगरपालिकांनी उत्कृष्ट काम केले असले तरी इतर नगरपालिकांमध्ये मात्र उद्दिष्टपूर्तीसाठी ओढाताण होत असल्याचे दिसत आहे़ आठही शहरी भागांसाठी २१ हजार २७४ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ १८ नोव्हेंबरपर्यंत १३ हजार ४१७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ७ हजार ८५७ शौचालये बांधावयाचे बाकी आहेत़ जिल्हाभरात नागरी भागामध्ये सरासरी ६३ टक्के वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी शासनस्तरावरून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते़
अनुदानाची रक्कमही प्रशासनाकडे उपलब्ध आहे़ निधी उपलब्ध असेल तर कामे गतीने होण्यास काहीच अडचण नाही़ परंतु, अजूनही नागरी भागातील नागरिकांची मानसिकता बदलत नसल्याने स्वच्छता अभियानाला खीळ बसत आहे़ प्रशासन स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी दररोज वेगवेगळे उपक्रम राबवित असले तरी शौचालयाचे उद्दिष्ट गाठताना मात्र अधिकारी आणि कर्मचाºयांची ओढाताण होत असल्याचे दिसत आहे़

Web Title: 63 percent of personal toilet construction work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.