६३५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम शासकीय नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:44+5:302020-12-29T04:14:44+5:30

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरू झाला. त्यावेळी आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली. रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात वैद्यकीय विशेषज्ञ, ...

635 contract workers want permanent government jobs | ६३५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम शासकीय नोकरी

६३५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम शासकीय नोकरी

Next

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरू झाला. त्यावेळी आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली. रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, आयुर्वेद, बीडीडीएस, बी.यु.एम.एस., आयुष्य वैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे लॅब टेक्नीशियन, एक्सरे- टेक्नीशियन, इसीजी टेक्नीशियन, इलेक्ट्रीकल, वॉर्ड बॉय, स्टाफ नर्स आदी चारशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी या कर्चचाऱ्यांनी काम केेले. मात्र, कंटात्री कालावधी संपत आल्यानंतर यापैकी काही कर्मचाऱ्यांना थेट कमी करण्यात आले. तर काही जणांना कालावधी वाढवून देण्यात आला. संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांना दिली जाणारी ही वागणूक म्हणजे ‘गरज सरो, वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे आहे. विशेष म्हणजे, सध्या आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. तरीही हळूहळू या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. मात्र, आम्ही संकटाच्या काळात काम केले आहे. त्यामुळे शासकीय सेवेत कायम करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: 635 contract workers want permanent government jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.