परभणीत ६४ मतदान केंद्रे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:11 AM2019-04-06T00:11:04+5:302019-04-06T00:11:26+5:30

परभणी लोकसभा मतदारसंघात ६४ मतदान केंद्रे क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आली असून या केंद्रांवर निवडणूक विभाग आणि पोेलीस प्रशानाचे विशेष लक्ष राहणार आहे.

64 polling centers in Parbhani sensitive | परभणीत ६४ मतदान केंद्रे संवेदनशील

परभणीत ६४ मतदान केंद्रे संवेदनशील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीलोकसभा मतदारसंघात ६४ मतदान केंद्रे क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आली असून या केंद्रांवर निवडणूक विभाग आणि पोेलीस प्रशानाचे विशेष लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरु झाला आहे. राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरु केली आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार १६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्राचा यापूर्वीच्या परिस्थितीचा अभ्यास करुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने क्रिटीकल मतदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे. एकूण ६४ मतदान केंदे्र क्रिटीकल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यात जिंतूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद प्रशाला सावंगी भांबळे खोली क्रमांक १, जिल्हा परिषद प्रशाला चारठाणा खोली क्रमांक १, जि.प. उर्दू कन्या शाळा मेवाती मोहल्ला जिंतूर, जि.प.प्रा.शा. चिकलठाणा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला वालूर, जि.प. हायस्कूल बोरी, जि.प. प्रा.शा. आसेगाव, जि.प. प्रा.शा. दुधगाव, जि. प.प्रशाला कौसडी, जि.प.प्रा.शा. न्यू राजमोहल्ला, डॉ. झाकीर हुसेन, प्रा.शाळा, राजमोहल्ला सेलू, मन्युसिपल कौन्सिल, शादीखाना सेलू, शासकीय मुलींचे वसतीगृह सेलू, न्यू हायस्कूल सेलू, गोमतीबाई बालवाडी सेलू, जि.प.प्रा.शा. ढेंगळी पिंपळगाव, परभणी विधानसभा मतदारसंघात जि.प.प्रा.शा. मांडवा, जि.प.हायस्कूल झरी, जि.प.प्रा.शा. सावंगी खु. , जि.प.प्रा.शा. टाकळी कुंभकर्ण, डॉ.झाकेर हुसेन माध्यमिक महाविद्यालय, श्रीरामजी मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्निक, जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, शनिवार बाजार, नगर परिषद प्राथमिक शाळा मोमीनपुरा, वसंतराव नाईक हायस्कूल कारेगावरोड, इंदिरा गांधी गर्ल्स उर्दू हायस्कूल शाही मशिदजवळ, कामगार कल्याण केंद्र काद्राबाद प्लॉट, भैय्यासाहेब आंबेडकर हॉल गौतमनगर, आंबेडकर वाचनालय राहुलनगर, पशुधन विकास अधिकारी कुकुटपालन प्रकल्प गंगाखेड रोड, महात्मा फुले विद्यालय, भीमनगर, मॉडेल उर्दू हायस्कूल गालीबनगर, जि.प.प्रा.शा. असोला, जि.प.प्रा.शा. बाभळी, जि.प.कन्या शाळा पिंगळी, गंगाखेड मतदारसंघात जि.प.कन्या शाळा ताडकळस, जि.प.प्रा.शा. दुसलगाव, जि.प.प्रा.शा. महातपुरी, जि.प.प्रा.शा. मरगळवाडी, जि.प.प्रा.शा. पूर्णा, जि.प.प्रा.शा. आंबेडकरनगर पूर्णा, जि.प.प्रा.शा. धनगरटाकळी, जि.प.प्रा.शा. उखळी खु., जि.प.प्रा.शा. चुडावा, जि.प.प्रा.शा. धारासूर. पाथरी मतदारसंघात जि.प. प्रा.शाळा. देवनांद्रा साखर कारखाना, वसाहत, जि.प.प्रा.शा. भोसा, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पेडगाव, जि.प.प्रा.शाळा, शेळगाव, जि.प.प्रा. शा. धामोनी, परतूर मतदारसंघात जि.प.प्रा.शा. तळणी दक्षिण बाजू, जि.प.प्रा.शा. तळणी उत्तर बाजू, जि.प.प्रा.शा. अंबोडा, जि.प.प्रा.शा. केंधळी, जि.प.प्रा.शा. पिंपळवाडी, जि.प.प्रा.शा. सोनदेव, जि.प.प्रा.शा. केंधळी. घनसावंगी मतदारसंघात चिटली पुटली, महाकळा (३), तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव या मतदान केंद्रांचा समावेश आहे.
वेबकास्टिंग करणार
४क्रिटीकल मतदान केंद्रावरील मतदानाची संपूर्ण प्रक्रिया वेबकास्टिंगच्या सहाय्याने आॅनलाईन केली जाणार आहे. तसेच या केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.

Web Title: 64 polling centers in Parbhani sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.